नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा
By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 26, 2020 17:33 IST2020-12-26T17:33:01+5:302020-12-26T17:33:07+5:30
नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा
नवी दिल्ली - रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे पुढच्या केवळ पाचच दिवसांत रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट देणार आहेत. खुद्द रेल्वेचे सीईओ व्ही. के. यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "प्रवाशांना रेल्वे तिकिट बूक करणे आणखी सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई तिकिटींग वेबसाईट नवीन सुविधांसह अपग्रेड केली जात आहे. यासाठीची आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून खुद्द रेल्वेमंत्री पीयूष गोयल काही दिवसांतच यासंदर्भात माहिती देणार आहेत. यादव शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता अधिकांश लोक प्लॅटफॉर्म काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे IRCTC वेबसाईट आणखी चांगली बनवणे आवश्यक आहे.
रेल्वेने नुकतेच बदलले आहेत तिकिट बुकिंगचे 'हे' नियम
- भारतीय रेल्वेने ई-तिकिट बुकिंग करण्याच्या नियमांत नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे. हा नंबर जी व्यक्ती प्रवास करत आहे तिचा असणे आवश्यक आहे.
- ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना रजिस्टर्ड कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणे आवश्यक आहे. मग तिकिट बुकिंग कुणीही केलेली असो.
- रेल्वेने म्हटले आहे, की अधिकांश प्रवासी दुसऱ्याच्या अकाउंटवरून बुकिंग करून प्रवास करतात. अनेक जण एजन्सीच्या मदतीनेही तिकिट बुक करतात. यामुळे प्रवाशांचा फोन नंबर PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.
- अशा स्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास अथवा ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास, त्याची माहिती मिळत नाही. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहे. सध्या रेल्वे एसएमएसच्या मदतीने प्रवाशांना यासंदर्भात माहिती देते.
- रेल्वेने म्हटले आहे, की सर्व प्रवाशांनी तिकिट बुकिंगच्या वेळी त्यांचा मोबाईल क्रमांकच नोंदवावा. यामुळे रेल्वेकडून मिळणारी सर्व माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहोचेल.
- याशिवाय रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारी माहितीही त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल.