शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

तेजस एक्सप्रेसमध्ये दिसणार 'रेल होस्टेस'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 9:47 AM

लवकरच विमानाप्रमाणेच तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांचं हसतमुखाने रेल होस्टेसकडून स्वागत केलं जाऊ शकतं.

ठळक मुद्दे लवकरच विमानाप्रमाणेच तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांचं हसतमुखाने रेल होस्टेसकडून स्वागत केलं जाऊ शकतं.8 तासात मुंबई गोवा अंतर पार करणारी लक्झरीयस एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये लवकरच प्रवाशांना रेल होस्टेस दिसण्याची शक्यता आहे. रेल होस्टेसचा प्रयोग मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये राबविला जाणार आहे.

मुंबई, दि. 28- विमान प्रवासात एअर होस्टेसकडून प्रवाशांचं स्वागत केलं जातं. तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांना लागणाऱ्या सुविधा पुरविण्याचं काम एअर होस्टेसकडून केलं जातं असल्याचं आपण पाहिलं आहे. विमान प्रवासातील हा अनुभव आता रेल्वे ट्रेनने प्रवास करतानाही प्रवाशांना अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. लवकरच विमानाप्रमाणेच तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवेश करताना प्रवाशांचं हसतमुखाने रेल होस्टेसकडून स्वागत केलं जाऊ शकतं.  8 तासात मुंबई गोवा अंतर पार करणारी लक्झरीयस एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या तेजस एक्सप्रेसमध्ये लवकरच प्रवाशांना रेल होस्टेस दिसण्याची शक्यता आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसचा प्रयोग मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये राबविला जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘आयआरसीटीसी’ला तेजसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. या रेल होस्टेस हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

तेजस एक्सप्रेस ही प्रवाशांना विमानप्रवासाचा फील देणारी, अत्याधुनिक ट्रेन आहे. तेजस एक्सप्रेस अगदी कमी वेळेतच लोकांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक डब्बा बनवण्यासाठी रेल्वेकडून 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसंच या ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे, डब्ब्यांमझ्ये सीसीटीव्ही कॅमेरा, कॉल बेल, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग या सगळ्या सुविधा प्रवाशांना अनुभवायला मिळत आहेत.

गतिमान एक्सप्रेसचा पॅटर्न राबविणाररेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून याआधी आग्रा-दिल्ली मार्गावरील गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसची नेमणूक केली आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाकडून आग्रा-दिल्ली मार्गावरील गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुंदरींची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी दिल्ली ते आग्रा आणि संध्याकाळी आग्रा ते दिल्ली अशा दोन फेऱ्या चालणाऱ्या गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना खानपान पुरविण्याची जबाबदारी रेल्वे सुंदरींवर आहे. गतिमान एक्सप्रेसमध्ये रेल होस्टेसच्या नेमणुका आयआरसीटीसीतर्फे करण्यात आल्या आहेत. एका डब्यातील प्रवाशांना वेळेत खाद्यपदार्थ पुरविण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांवर असते. त्यासोबत स्वच्छतेसाठी अन्य कर्मचारीही नेमले जाते.