दिवसा असतात सुटाबुटात, रात्री गोणपाटात! रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:52 IST2025-01-10T16:52:34+5:302025-01-10T16:52:51+5:30
रेल्वेने गेली कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांच्या वसाहतींकडे लक्षच दिलेले नाहीय. यामुळे ही कॉर्टर्स अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अशाच घरांत या रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह रहावे लागत आहे.

दिवसा असतात सुटाबुटात, रात्री गोणपाटात! रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल...
काही वर्षांपूर्वी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडल्या जाणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पगार तर भरघोस मिळतो. पण त्यांना जीर्ण झालेल्या घरांत राहण्याची वेळ येत आहे. दिवसभर चांगले इस्त्री केलेले स्वच्छ कपडे, बुट घालून लोकांत वावरायचे आणि रात्री पापडी धरलेल्या, गळक्या भिंती, जीर्ण झालेली फरशी अशा दुर्दशेत झोपावे लागत आहे.
रेल्वेने गेली कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांच्या वसाहतींकडे लक्षच दिलेले नाहीय. यामुळे ही कॉर्टर्स अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. अशाच घरांत या रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह रहावे लागत आहे.
या घरांची परिस्थिती एवढी भयावह आहे की कोणत्याही क्षणी ही घरे कोसळू शकतील अशा अवस्थेत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तक्रारी करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. ही घरे पाहून अनेकांना दिवसा असतात सुटाबुटात, रात्री झोपतात गोणपाटात... हा कॉलेजमधील गॅदरींगवेळचा शेला पागोटा आठवला असेल.
याहून ही परिस्थिती वेगळी नाही. संबळ रेल्वे स्टेशनवरील रेल्वे कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे. पावसाळ्यात तर या घरांची हालत बेकार होते. आतमध्ये पाणी घुसते आणि तक्रार केली की तेवढ्यापुरती दुरुस्ती केली जाते. अशीच परिस्थिती अन्य ठिकाणांचीही असण्याची शक्यता आहे.