रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ

By Admin | Updated: February 26, 2015 18:38 IST2015-02-26T18:38:48+5:302015-02-26T18:38:48+5:30

प्रवासी भाडयात दरवाढ न करता रेल्वे प्रवाशांना दिलासा देणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी मालवाहतूक दरात मात्र वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Railway budget: 8 to 10 percent increase in freight rates | रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ

रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - प्रवासी भाडयात दरवाढ न करता रेल्वे प्रवाशांना दिलासा देणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी मालवाहतूक दरात मात्र वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. येत्या १ एप्रिलपासून मालवाहतूक दरामध्ये ८ ते १० टक्के दरवाढ होणार असल्याने यंदाच्या रेल्वे बजेटकडून मालवाहतूकदरांना कोणताही दिलासा मिळणार नाही. सिमेंट, लोखंड, स्टील, धान्य आणि डाळी, यूरीया, भुईमुगाचे तेल, एलपीजी आणि केरोसिनवर दरवाढ करण्यात आली आहे. सिमेंट (२.७ )टक्के , कोळसा (६.३ )टक्के , लोखंड व स्टील (०.८ )टक्के , धान्य आणि डाळी (१० )टक्के , यूरीया (१० )टक्के , भुईमुगाचे तेल (२.१ )टक्के , एलपीजी (०.८ )टक्के आणि केरोसिनवर (०.८ )टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, चुनखडी, मॅग्नीज आणि स्पीड डिझेलच्या दरात ०.३ ते १ टक्का कपात करण्यात येणार आहे.

Web Title: Railway budget: 8 to 10 percent increase in freight rates