शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने दिली नववर्षात महागाईची भेट; काँग्रेस, माकपने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 09:38 IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 19 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच नव्या वर्षात रेल्वे सेवाही महागली आहे. ही दरवाढ भाजपा सरकारकडून देशवासियांना मिळालेले गिफ्ट असल्याची टीका काँग्रेस आणि माकपने केली आहे. केंद्र सरकारने 31 डिसेंबरपासून रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. एक ते चार पैसे प्रति किलोमीटर अशी ही दरवाढ असून प्रत्येक दर्जाच्या सेवेसाठी दर वेगवेगळे राहणार आहेत. 

नव्या वर्षाला प्रारंभ होताच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. विनाअनुदानित घरगुती सिलिंडर 19 रुपयांनी महागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने ही दरवाढ झाली आहे. भारतातून इंधनाची 84 टक्के आयात केली जाते. त्यामुळे तेथील दरांचा परिणाम हा भारतातील अर्थकारणावर होतो. दोन्ही दरवाढीवरून काँग्रेस आणि माकपने भाजपावर निशाणा साधला आहे. 

सर्वसामान्य नागरिक आधीपासूनच महागाईने त्रस्त आहेत. असं असताना गॅस सिलिंडरची दरवाढ ही त्यांना आणखी आर्थिक गर्तेत नेणार असल्याचे काँग्रेस प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी म्हटलं आहे. तसेच एकीकडे नोकऱ्या जात असताना दुसरीकडे मोदी सरकार सर्वसामान्यांचे जगणे महाग करत असल्याची माकपचे महासचिव टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे. मोदी सरकारकडून देशवासियांना मिळालेलं हे अनोख गिफ्ट असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर  (14.2 किलो)च्या दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (19किलो)च्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. 

लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने घेतला. या घोषणेनंतर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. नवे तिकीट दर प्रतिकिमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड येत होता. परिणामी, रेल्वे प्रशासनाने त्यावेळी तिकीट खिडक्यांवरून तिकिटांची विक्री केली. नवे तिकीट दर अपलोड करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. मात्र यामुळे रेल्वेचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसCylinderगॅस सिलेंडरrailwayरेल्वे