रायगड पट्टा
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:13+5:302015-08-18T21:37:13+5:30
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

रायगड पट्टा
व द्यार्थ्यांना गणवेश वाटप नागोठणे : स्वातंत्र्यदिनी विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने वेलशेत, आंबेघर गावातील अंगणवाड्यांतील आणि रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या वितरण सोहळ्याला सरपंच नंदिनी बडे, उपसरपंच गंगाराम मिणमिणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शि.ल.पाटील, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लवटे, सुधाकर पारंगे उपस्थित होते. ...बाजारात खरेदीसाठी गर्दी रेवदंडा : चार दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी चालू होेत्या. शनिवार, रविवारी सुटी असताना पावसामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. मात्र पावसाने मंगळवारी उघडीप दिल्याने जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येवून ठेपल्याने बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठीही खरेदी सुरू झाली आहे, तसेच रक्षाबंधनासाठीही खरेदीला जोर आला आहे.