शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी, वस्त्रोद्योग कंपन्यांवर छापे, 27 ठिकाणी IT ची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 05:47 IST

27 ठिकाणी प्राप्तिकर विभागाची छापेमारी, 1.40 कोटींची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील एका मोठ्या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापेमारी करत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी मुंबई आणि दिल्ली येथे २७ ठिकाणी छापेमारी केली.मिळालेल्या माहितीनुसार, कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत या समूहाने शेअर बाजारात कार्यरत आपल्या विविध कंपन्यांच्या समभागांच्या किमतीमध्ये वाढ करण्यासाठी या कंपन्यांचा नफा वाढवून दाखविला. यासाठी खरेदी-विक्रीचे अनेक बनावट आणि कागदोपत्री व्यवहार करत त्यातील नफेखोरी वाढवून दाखवली. याचा परिणाम कंपनीच्या समभागांच्या किमती वाढण्याच्या दृष्टीने झाला. 

संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे सापडलीयाशिवाय, समूहातील दोन कंपन्यांत कागदोपत्री व्यवहार दाखवत तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार हे रोखीने केल्याचेही दिसून आले. याचप्रकारे समूहातील दुसऱ्या दोन कंपन्यांत १५० कोटी रुपयांचे व्यवहारही रोखीने झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासादरम्यान दिसून आले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संशयास्पद व्यवहारांची अनेक कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असून, याचसोबत संगणकदेखील जप्त केला आहे.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस