मडगाव : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात सध्या क्राइम ब्रँचच्या ताब्यात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या वार्का येथील घरावर तसेच कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.या छापासत्रामुळे आलेमाव यांच्या घरातही काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते. चर्चिल यांच्या कुटुंबीयांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनाही बोलविण्यात आले. या छाप्यात क्राइम ब्रँचच्या हाती नेमके काय लागले, हे मात्र कळू शकले नाही. आलेमाव हे सध्या क्राइम ब्रँचच्या अटकेत असून त्यांची कोठडी १३ आॅगस्ट रोजी समाप्त होणार आहे.
आलेमाव यांच्या घर, कार्यालयावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 02:45 IST