मोदींच्या मौनावर राहुल यांचे टीकास्त्र
By Admin | Updated: April 9, 2016 00:55 IST2016-04-09T00:55:57+5:302016-04-09T00:55:57+5:30
पनामा पेपर्स लीक प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचे पुत्र अभिषेक सिंग यांचे नाव आले असतानाही त्यांच्याविरुद्ध चौकशी का सुरू करण्यात आली नाही
मोदींच्या मौनावर राहुल यांचे टीकास्त्र
कमालपूर (आसाम) : पनामा पेपर्स लीक प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांचे पुत्र अभिषेक सिंग यांचे नाव आले असतानाही त्यांच्याविरुद्ध चौकशी का सुरू करण्यात आली नाही, याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.
काळा पैसा परत आणण्याची टोलेजंग आश्वासने देणाऱ्या मोदींनी या प्रकरणावर मौन का पाळले आहे, असा सवालही त्यांनी आसाममधील कमालपूर येथील प्रचारसभेत केला. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी देशातून पळून गेले त्यांना मायदेशी परत का आणले नाही, असा प्रश्न मी संसदेत विचारला तेव्हा मोदींनी एकाही शब्दाने उत्तर दिले नव्हते. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी देशातून पळून जाण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदभवनात भेट घेतली होती, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)