राहुल गांधींच्या अमेठीमध्ये भेटीगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:36 IST2018-07-06T01:36:22+5:302018-07-06T01:36:33+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्थानिक संसद सदस्य राहुल गांधी यांनी गुरुवारी अमेठीत जनता दरबार घेतला. या वेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.

 Rahul Gandhi's visit to Amethi | राहुल गांधींच्या अमेठीमध्ये भेटीगाठी

राहुल गांधींच्या अमेठीमध्ये भेटीगाठी

अमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष आणि स्थानिक संसद सदस्य राहुल गांधी यांनी गुरुवारी अमेठीत जनता दरबार घेतला. या वेळी त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी हे येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य संजय सिंह आणि त्यांच्या पत्नी अमिता सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षांशी चर्चा केली. विद्यार्थी, कार्यकर्ते, व्यापारी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
उत्तर प्रदेशचे माजी मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते रामलाखन पासी यांच्या कन्या संगीता आनंद व त्यांच्या पतीनेही राहुल यांची भेट घेतली. आम्ही आमच्या खासदारांना भेटण्यास आलो होतो, असे या दोघांनी सांगितले. मात्र भाजपाचे काही नेते व कार्यकर्ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांनी शहीद अनिल कुमार मौर्या यांच्या नारायणी गावातील घरी भेट दिली आणि कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)

Web Title:  Rahul Gandhi's visit to Amethi