शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

राहुल गांधी यांची शिक्षा कायम; स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 06:25 IST

सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची काॅंग्रेसची तयारी

अहमदाबाद : मोदी आडनावाच्या टिप्पणीवरून गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका गुजरात हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला असून, तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपकडून मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत झाले.

शिक्षेला स्थगिती दिली असती तर राहुल गांधींचे संसद सदस्यत्व बहाल करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक म्हणाले की, गांधी यांच्यावर देशभरात आधीच १० खटले सुरू आहेत आणि कनिष्ठ न्यायालयाचा त्यांना दोषी ठरवणारा आदेश न्याय, योग्य आणि वैध होता. शिक्षेला स्थगिती देण्याचे कोणतेही वैध कारण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सत्यावर असत्याचा पडदा पडणार नाही

अहंकारी शक्ती सत्य दडपण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरत आहे. राहुल गांधी त्यांच्याशी सत्य आणि लोकांच्या हितासाठी लढत आहेत. अभिमानी सत्तेला जनहिताचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत, देशातील जनतेचे जीवनमान सुधारणारे प्रश्न उपस्थित होऊ नयेत, महागाईवर प्रश्न विचारू नयेत, रोजगारावर काहीही विचारू नये असेच वाटते. पण, सत्य, सत्याग्रह आणि जनतेच्या सामर्थ्यासमोर सत्तेचा अहंकार फार काळ टिकणार नाही आणि सत्यावर असत्याचा पडदा पडणार नाही.    - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस.

...त्यांनी संधी नाकरली

आजचा निर्णय कायदेशीर, न्याय्य आणि स्वायत्त आहे. नेते आणि संघटनांचा अपमान करणे हा राहुल गांधींचा स्वभाव आहे. राहुल गांधी लोकांना अपमानित करणे हा आपला हक्क मानत असतील तर त्यांच्याशी निगडित कायदा आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधीही दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली. हा तुमचा बेजबाबदार उद्दामपणा आहे.    - रविशंकर प्रसाद, माजी केंद्रीय मंत्री.

काय आहे प्रकरण?गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या २०१९ च्या खटल्यात सुरतच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना भादंविच्या कलम ४९९ आणि ५०० (फौजदारी मानहानी) अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा