शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

संबित पात्रांकडून राहुल गांधींची खिल्ली, ट्विटरवर नेटीझन्स भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 16:54 IST

अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे

ठळक मुद्देअशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहेगेहलोत यांच्या या वक्तव्याची संबित पात्रा यांनी ट्विटरवरुन खिल्ली उडवली. सचिन पायलट यांना उद्देशून माध्यमांना चांगले बाईट देणे, सुंदर, देखणे असणे, हे गेहलोत यांचे वक्तव्य राहुल गांधींशी जोडण्याचा प्रयत्न पात्रा यांनी केला होता.

मुंबई - राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन पायलट यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. 

अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे.  20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. नवी पिढी हे सगळं बघत आहे. भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. तसेच, अशोक गहलोत पुढे म्हणाले की, नव्या पीढीवर आमचं प्रेम, येणारे दिवस त्यांचेच आहेत, आमचे सहकारी भाजपाच्या जाळ्यात फसले. भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे. चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात असं असं देखील गहलोत यांनी म्हटले. गेहलोत यांच्या या वक्तव्याची संबित पात्रा यांनी ट्विटरवरुन खिल्ली उडवली. सचिन पायलट यांना उद्देशून माध्यमांना चांगले बाईट देणे, सुंदर, देखणे असणे, हे गेहलोत यांचे वक्तव्य राहुल गांधींशी जोडण्याचा प्रयत्न पात्रा यांनी केला होता. त्यानंतर, अनेकांनी पात्रा यांना टार्गेट केले, तर काहींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली. त्यानंतर, संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा ते ट्विट रिट्विट करत, मी माझ्या ट्विटमधील काही शब्द काढून टाकत असल्याचे म्हटले. Good Byte & Handsome हे दोन शब्द मी कमी करत आहे, आता तरी ठिक आहे ना? असे म्हणत पात्रा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींची अप्रत्यक्षपणे खिल्लीच उडवली. पात्रा यांच्या या ट्विटवरही संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.  

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटर