शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 06:28 IST

पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०० जागा लढवणार आहे. एखादवेळी ३०० पेक्षाही कमी जागा लढवू शकते, असे संकेत पक्षाच्या ‘वॉर रूम’मधून मिळत आहेत.

पक्षाने भलेही २०१९ मध्ये ४२३ किंवा २०१४ मध्ये ४६४ जागा लढवल्या असतील. मात्र, विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या दहा टक्के जागाही पक्षाला मिळवता आल्या नव्हत्या. त्यामुळे पक्षनेते राहुल गांधी यांनी रणनीती बदलली असून, अधिक जागा जिंकण्यासाठी अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचे धोरण आता अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रातही कमी जागांवर समाधान - महाराष्ट्रात यावेळी अधिक जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जास्त जागा देण्याचे पक्षाने ठरवले आहे. तामिळनाडू, बिहार, केरळ व झारखंडमध्येही पक्षाने समविचारी पक्षांसोबत युती केली आहे.

- आंध्र प्रदेश व ओडिशा यांसारख्या काही राज्यांत काँग्रेसची स्थिती ठीक नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड या भाजपशी थेट मुकाबला असलेल्या राज्यांत तसेच ईशान्येत आसाम वगळता अन्य राज्यांत तुल्यबळ लढा देण्यासाठी काँग्रेससमोर अडथळ्यांची शर्यत आहे. मात्र, सत्तेत असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटकात आपल्या खासदारांची संख्या वाढण्याची पक्षाला आशा आहे.

- महाराष्ट्रात काँग्रेसने २०१९ मध्ये २५ जागा लढवल्या होत्या. - उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी १७ जागा लढविण्याचा विचार.

कुठे होणार जागा कमी? २०१९ मध्ये काँग्रेसने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी ६७ जागा लढवल्या. मात्र, एकाच जागेवर यश मिळाले. त्यामुळे यावेळी तेथे केवळ १७ जागा लढवून विजयी जागांची संख्या किमान ५ पर्यंत नेऊ शकण्याची पक्षाला आशा आहे. 

२०१९ मध्ये काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये ४० जागा लढवल्या होत्या. परंतु, केवळ दोनच जागा जिंकता आल्या. यावेळी पक्ष बंगालमधील केवळ त्या जागांवर उमेदवार देणार आहे जेथे विजयाची खात्री वाटते. त्याचबरोबर तेथे तृृणमूल काँग्रेससोबत जरी युती नाही झाली तरी ऐनवेळी काहीतरी तडजोड होईल, अशी पक्षाला आशा आहे. 

‘आप’सोबत युती करण्यासाठी काँग्रेसने हरयाणा, दिल्ली व गुजरातमध्ये ‘आप’ला जागा दिल्याने एप्रिलमध्ये पंजाबमध्येही दोन्ही पक्षांत जागांबाबत तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र