शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मास्टरप्लॅन! राहुल गांधींनी सांगितला फॉर्म्युला; २०२४ ला भाजपाला हरवले जाऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 15:14 IST

कर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला.

कॅलिफोर्निया - काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांना भेटताना राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. आपल्या प्रदीर्घ भाषणात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत पीएम मोदींना टोला लगावला. कर्नाटकातील नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या विजयाचा अभिमान वाटत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. त्यासोबत २०२४ मध्ये भाजपाचा पराभव होऊ शकतो असंही त्यांनी दावा केला. 

राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो. त्यासाठी भारतातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. काँग्रेस पक्ष देशातील सरकार बदलण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे. विरोधकांनी एकत्र येत युती करून भाजपाला घेरण्याचे काम केले तर देशातील सत्ताधारी भाजपचा पराभव होऊ शकतो. मंगळवारी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सांताक्रूझच्या सिलिकॉन व्हॅली कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात मॉडरेटर आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना राहुल गांधींनी उत्तरं दिली. भाजपमधील कमकुवतपणा आणि उणिवा स्पष्टपणे दिसत आहेत, त्यामुळे भाजपा निवडणूक हरणार असून त्यांना सत्तेतून बाहेर काढू असं राहुल गांधींनी म्हटलं. 

भाजपाला आमची यंत्रणा समजली नाहीकर्नाटकातील विजयाचा हवाला देत राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष मोठ्या विजयासाठी बराच काळ काम करत होता आणि संपूर्ण निवडणुकीदरम्यान भाजपाला काँग्रेसची निवडणूक यंत्रणा समजू शकली नाही. म्हणूनच कर्नाटकात त्यांचा दारूण पराभव झाला आणि कर्नाटकच्या विजयाचे सार भारत जोडो यात्रेतून मिळाले. आमची भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा वापर करून आमच्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जनतेची आम्हाला साथ मिळाली आणि ते काहीही करू शकले नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी भाजपावर केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा