शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

राहुल गांधींची गुजरात निवडणुकीत एंट्री; बेरोजगारी व महागाईच्या मुद्द्याला घातला हात, कर्जमाफीवरून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 06:15 IST

राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

कमलेश वानखेडे -

राजकोट : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवून गुजरातमध्ये दाखल होत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारी व महागाईचे कार्ड खेळत युवक, मध्यमवर्गीयांसह लघुउद्योजकांना साद घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा थेट उल्लेख करणे टाळत जनतेच्या मनातील मुद्द्यांना हात घालण्यावर त्यांनी अधिक भर दिला.

सोमवारी सायंकाळी राहुल गांधी यांनी राजकोटच्या शास्त्री मैदानावर प्रचार सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

गुजरात लघु व मध्यम उद्योगांचे केंद्र आहे. संपूर्ण देश तुम्ही चालविता. तुम्ही खरे रोजगार देता. पण सरकारने नोटबंदी केली. सर्व लघु व मध्यम उद्योग बंद झाले. चुकीची जीएसटी लागू केली. त्यामुळे जे वाचले होते तेही संपले. अरबपतींसाठी यांना रस्ता साफ करायचा होता. तीन-चार उद्योगपतींचे लाखो-कोटींचे कर्ज माफ होेते; पण शेतकरी एक लाखाचे कर्ज घेतो ते माफ का होत नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.     - राहुल गांधी

यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गुजरातमधून जात नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजकोटच्या सभेत राहुल यांनी या मुद्द्याला हात घालत ही यात्रा गुजरातमधून न निघाल्याचे दु:ख असल्याचे सांगितले. पण सोबतच भारत जोडो सुरू करण्यामागे महात्मा गांधींचा, गुजरातचा विचार आहे. - हा रस्ता गांधी, सरदार पटेल यांनी दाखविला होता, असे सांगत त्यांनी गुजरातला क्रेडिट दिले. मी दोन हजार किलोमीटर चाललो ही काही मोठी गोष्ट नाही. लॉकडाऊनमध्ये या देशातील मजूर उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालले. त्या संकटकाळात गुजरात सरकारने मदत केली नाही. उलट त्याचवेळी देशातील श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ केले, अशी टीका करीत आम्हाला न्याय करणारा भारत हवा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसींच्या जिवात जीव आलानिवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त होते. गुजरातची पहिल्या टप्प्यातील निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही राहुल यांची एकही जाहीर सभा झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते चिंतित होते. पण राजकोटच्या सभेने काँग्रेसींच्या जिवात जीव आला. राहुल गांधी यांच्या सभेने मिळालेल्या बूस्टरमुळे पुढचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा