आमच्या खासदाराला भेटायचं आहे सांगत अडवला राहुल गांधींचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 18:48 IST2016-09-02T17:08:50+5:302016-09-02T18:48:39+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी 150हून जास्त महिलांनी आंदोलन करत ताफा अडवला

Rahul Gandhi's cushion to stop meeting with our MP | आमच्या खासदाराला भेटायचं आहे सांगत अडवला राहुल गांधींचा ताफा

आमच्या खासदाराला भेटायचं आहे सांगत अडवला राहुल गांधींचा ताफा

- ऑनलाइन लोकमत
अमेठी, दि. 2 - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी 150हून जास्त महिलांनी आंदोलन करत ताफा अडवला. राहुल गांधी अमेठी दौ-यावर आहेत, यावेळी आपल्या मतदारसंघात चालले असताना त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिला अंगणवाडी सेविका असून पगारवाढ करण्याच्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.
 
अंगणवाडी सेविकांना राहुल गांधींची भेट घेऊन आपली मागणी त्यांच्यासमोर ठेवायची होती. मात्र पोलिसांनी महिलांना अडवल्याने राहुल गांधींची भेट त्या घेऊ शकल्या नाहीत. मात्र यानंतर राहुल गांधींनी स्वत: या महिलांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांनी यावेळी आपल्या मागण्या राहुल गांधींसमोर सादर केल्या. 
 
राहुल गांधी सध्या तीन दिवसाच्या अमेठी दौ-यावर आहे. अनेक गावक-यांनी आमच्या खासदाराला भेटता येत नाही त्यामुळे आमच्या समस्या सोडवल्या जात नाहीत अशी खंत व्यक्त केली आहे. राहुल गांधी आपल्या मतदारसंघात जात नाहीत यामुळे विरोधकांनीही टीका केली होती.
 

Web Title: Rahul Gandhi's cushion to stop meeting with our MP