"...अशी चव कधी घेतली नाही", राहुल गांधी चॉकलेट कारखान्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:15 IST2023-08-28T05:41:17+5:302023-08-28T10:15:37+5:30

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चॉकलेट बनवताना आणि येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.

Rahul Gandhi's chocolate-making endeavor at Ooty factory | "...अशी चव कधी घेतली नाही", राहुल गांधी चॉकलेट कारखान्यात

"...अशी चव कधी घेतली नाही", राहुल गांधी चॉकलेट कारखान्यात

उटी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील उटी येथील चॉकलेट बनविणाऱ्या कंपनीला नुकतीच भेट दिली. त्यांनी व्यक्त केले.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चा समान दर लागू करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चॉकलेट बनवताना आणि येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. येथे महिलांची ७० जणांची टीम चांगले काम करत आहे. त्यांनी तयार केलेली चॉकलेट्स चांगली आहेत, अशा चॉकलेट्सची चव मी कधीही घेतली नव्हती, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

Web Title: Rahul Gandhi's chocolate-making endeavor at Ooty factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.