शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:23 IST

राहुल गांधी यांनी बजाज पल्सरसोबत स्वतःचा फोटो शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या चार दिवसांच्या कोलंबिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोलंबियामधील EIA विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर भारतीय लोकशाहीवर हल्ला करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी ट्विटरवर बजाज, हिरो आणि टीव्हीएसचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली. याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा केला.

राहुल गांधी यांनी बजाज पल्सरसोबतचा स्वतःचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, "कोलंबियामध्ये बजाज, हिरो आणि टीव्हीएस इतके चांगले काम करत आहेत, हे पाहून अभिमान वाटतो. यावरुन असे दिसून येते की, भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर 'इनोव्हेशन'च्या जोरावर यशस्वी होऊ शकतात." 

राहुल गांधींनी "क्रोनीझम" या शब्दाचा वापर केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी वापरला आहे. ‘क्रोनीझम’ म्हणजे, मित्रांना किंवा निकटवर्तीयांना लाभ मिळवून देणे. या शब्दाचा वापर करुन त्यांनी अदानी आणि अंबानी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

भारतातील लोकशाही धोक्यात

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, "भारतामध्ये सध्या सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर होत असलेला हल्ला आहे. भारतात अनेक धर्म, परंपरा, आणि भाषा आहेत. सर्व परंपरा, सर्व धर्म आणि सर्व विचारांसाठी जागा आवश्यक आहे. ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. मात्र, सध्या भारतातील लोकशाही व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे. लोकशाही हीच सर्वांना संवादाची संधी देते. मात्र सध्या भारतात लोकशाही धोक्यात आली आहे," अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

भाजपचा पलटवार

राहुलच्या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर हल्ला केला. पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा प्रचार नेत्यासारखे वागत आहेत. ते परदेशात जातात आणि भारतीय लोकशाहीवर टीका करतात." भाजपच्या प्रदीप भंडारी यांनीदेखील गांधी-वाड्रा कुटुंबावर टीका करत म्हटले की, "राहुल गांधी भारतविरोधी आहेत. त्यांनी भारताला गरीब ठेवण्याचे काम केले. जेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला आहे, तेव्हा ते ईर्ष्येने आणि द्वेषाने भारताच्या प्रगतीवर हल्ला करत आहेत." 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi slams BJP from Columbia, praises Indian companies.

Web Summary : Rahul Gandhi, during his Columbia visit, criticized the BJP, alleging attacks on Indian democracy. He praised Bajaj, Hero, and TVS, highlighting their innovation-driven success, contrasting it with cronyism. BJP leaders retaliated, accusing Gandhi of undermining India.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानी