शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'मी दोन मुद्दे उपस्थित केले आणि संपूर्ण मीडिया माझ्याविरोधात गेला' - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:30 IST

'मीडिया 24 तास माझ्यासाठी वाह-वाह करायचा. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केले.'

Rahul Gandhi: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधींनी (Rahul Gandhi) राजकारणातील सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सुरुवातीची 5-6 वर्षे देशातील प्रसारमाध्यमे त्यांची खूप प्रशंसा करत होते. परंतु त्यानंतर सर्वकाही बदलले, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. 'माझ्या मीडिया इमेजचे सत्य काय?', या कॅप्शनसह राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला.

हे दोन मुद्दे उपस्थित केलेव्हिडिओमध्ये राहुल म्हणाले, “मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा 2008-09 पर्यंत देशातील संपूर्ण मीडिया माझ्यासाठी 24 तास 'वाह, वाह' करायचे. मग मी नियामगिरी आणि भट्टा-परसौल, हे दोन मुद्दे मांडले आणि सर्व काही बदलले. मी जमिनीचा मुद्दा उचलून धरला आणि गरीब लोकांचे रक्षण करू लागलो, तेव्हा संपूर्ण मीडियाने माझ्या विरोधात जाऊन तमाशा सुरू केला," अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

माझी प्रतिमा डागाळण्याचे काम भाजपचेते पुढे म्हणाले, "आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला आणि त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी इतर कायदेही आणले. त्यानंतर मीडियाने 24 तास माझ्या विरोधात लिहायला सुरुवात केली. भारताची संपत्ती(राजे महाराजांची संपत्ती) होती ती राज्यघटनेच्या माध्यमातून जनतेला देण्यात आली होती, पण भाजप याच्या उलट करत आहे. तीच संपत्ती ते 'महाराजांना' परत देत आहेत. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले,' असा आरोपही राहुल यांनी केला.

ते दोन मुद्दे कोणते?ओडिशातील वेदांताच्या खाणकामासाठी नियामगिरीच्या भूसंपादनाला राहुल गांधींनी विरोध केला होता. त्यांनी ते बेकायदेशीर म्हटले आणि नंतर ते बंद केले. 2011 मध्ये उत्तर प्रदेशातील भट्टा, परसौल येथे भूसंपादनावरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा विरोध दिसून आला. तत्कालीन मायावती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी भेट दिली होती आणि राहुल गांधींच्या राजकारणातील प्रवासातील हा एक लोकप्रिय प्रसंग होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा