शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बलात्कार करतात, तरीही पंतप्रधान गप्प बसतात- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:24 IST

महिला सुरक्षेच्या मुद्यावरुन राहुल गांधींचं टीकास्त्र

जयपूर: उत्तर प्रदेशात एक आमदार महिलेवर बलात्कार करतो. पण पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्द निघत नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढ़ाओची घोषणा देतात. महिलांसाठी ही घोषणा चांगली आहे. मात्र ज्यावेळी खरंच काहीतरी करुन दाखवायची वेळ आली, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही, अशी टीका राहुल यांनी केली. ते कोटामध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी राहुल गांधींनी महिला काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं. 'महिला काँग्रेस अनेक बाबतीत आम्हाला मागे टाकून पुढे गेल्या आहेत. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर, शहरात, गावात जागोजागी पाहायला मिळतात. महिला काँग्रेसनं पक्षाच्या सर्व विभागांना मागे टाकलं आहे. मात्र जेव्हा भाजपाशी दोन हात करण्याची वेळ येते, तेव्हा महिला काँग्रेस दिसत नाही. तुम्ही सर्व आघाड्यांवर भाजपाशी संघर्ष कराल, अशी आशा आहे,' असं राहुल गांधी म्हणाले. लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या राजस्थानात भाषण करताना राहुल यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारवर तोंडसुख घेतलं. जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होत असताना भारतात मात्र इंधनाचे दर भडकले आहेत. आधी गॅस सिलेंडर चारशे रुपयांना मिळत होता. आता त्यासाठी नऊशे रुपये मोजावे लागतात. काँग्रेसच्या हातात सत्ता दिल्यास ही महागाई कमी होईल. त्यामुळे काँग्रेसला विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानRapeबलात्कारcongressकाँग्रेसBJPभाजपा