शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांपासून बेटी बचाव; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 15:23 IST

कथुआ, उन्नाव प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर तोफ डागली

बंगळुरू: मोदी सरकारनं आधी 'बेटी बचाव, बेटी पढाव', अशी घोषणा दिली होती. मात्र आता त्या घोषणेत बदल झालाय. आता भाजपच्या आमदारांपासून बेटी बचाव, अशी सरकारची घोषणा आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर टीका केलीय. कथुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणांमुळे देश ढवळून निघाला. कथुआमधील बलात्कार प्रकरणात भाजपचे दोन आमदार आरोपींच्या बचावासाठी रस्त्यावर उतरले होते. तर उन्नावमधील प्रकरणात भाजपच्या आमदाराला अटक करण्यात आली होती. याच घटनांचा संदर्भ देत राहुल गांधी भाजपवर बरसले. त्यांनी कलगीमध्ये जनसभेला संबोधित केलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहेत. यावेळी जनसभेला संबोधित करताना त्यांनी दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांवरुन मोदी सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. 'मोदी निवडणूक दौऱ्यांमधील भाषणांमध्ये कायम दलितांचा उल्लेख करतात. मात्र दलितांवरील हल्ल्यावर ते काहीही बोलत नाहीत. भाजपच्या नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दलितांवर हल्ले केल्यावर मोदी मूग गिळून गप्प बसतात,' अशा तिखट शब्दांमध्ये राहुल गांधी मोदींवर बरसले. राहुल गांधींनी महागाईच्या मुद्यावरुनदेखील मोदी सरकारला लक्ष्य केलं. जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होत असताना भारतात इंधनाचे दर कसे काय वाढतात, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कसं खोटं बोलतात, हे देशातील तरुणांना माहितीय. मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा, मुजरांचा पैसा नीरव मोदीला दिला, असाही आरोप राहुल यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं 90 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचा दावाही त्यांनी केला.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस