शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

मसूद प्रकरणावर राहुल भडकले, म्हणे, जिनपिंगना मोदी घाबरतात, आता गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 12:08 IST

 मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्तावावर चीननं नकाराधिकारा(विटोचा)चा वापर केल्यानंतर भारतातल्या राजकीय हालचाली वाढल्या आहे.

नवी दिल्ली-  मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्तावावर चीननं नकाराधिकारा(विटोचा)चा वापर केल्यानंतर भारतातल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारताला हा मोठा धक्का बसला असतानाच विरोधकांनीही या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगना घाबरतात. चीन जेव्हा जेव्हा भारताविरोधात एखादा निर्णय घेतो, त्यावेळी मोदी काहीही बोलत नाहीत.राहुल गांधींनी मोदींच्या चीन धोरणावरही सडकून टीका केली आहे. मोदी शी जिनपिंग यांच्याबरोबर झोके घेतात, दिल्लीत त्यांची गळाभेट घेतात, चीनमध्येही त्यांच्यासमोर झुकतात, असं म्हणत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेमध्ये चीननं नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर काँग्रेसनं मोदींना धारेवर धरलं आहे. मोदींनी परराष्ट्र नीती म्हणजे 'कूटनीतीला अपवाद' असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला यांनी ट्विट करत चीन आणि पाकिस्तानवर टीका केली आहे.दहशतवादाविरोधात जागतिक लढाईतला हा दुःखद दिवस आहे. दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानच्या बरोबर चीन असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत.  मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीननंनकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीmasood azharमसूद अजहरchinaचीन