शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "भ्रष्टाचारात बुडालेल्या भाजपाची सत्तेसाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्याची मोहीम; ED, CBI आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 10:31 IST

Rahul Gandhi Slams BJP Over Hemant Soren : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

ईडी, सीबीआय आणि आयटी आता भाजपाचे साथीदार झाले आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "ईडी, सीबीआय, आयटी इत्यादी आता सरकारी संस्था नाहीत. आता ते भाजपाचा विरोधी पक्षाला मिटवण्याचा सेल बनले आहे. स्वतः भ्रष्टाचारात बुडालेला भाजपा सत्तेसाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवत आहे" असं म्हणत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं. 

प्रियंका गांधी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "विरोधमुक्त संसद, लोकशाहीमुक्त भारत, प्रश्नमुक्त मीडिया आणि सुसंवादमुक्त जनता - हे भाजपा सरकारचं ध्येय आहे. सर्व राज्यांमध्ये एक एक करून सरकार पाडलं जात आहे. विरोधी पक्षनेत्यांना त्रास दिला जात आहे. जो भाजपामध्ये सामील होणार नाही तो तुरुंगात जाईल."

"झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे ईडी लावून त्रास देणं आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणं हे याच दुर्भावनापूर्ण मोहिमेचा भाग आहे. 140 कोटी जनतेचा आवाज दाबून टाकू शकतो हा भाजपाचा भ्रम आहे. जनता प्रत्येक अत्याचाराला उत्तर देईल" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी खोचक टीका केली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय