शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : लोकशाहीवर हल्ले, यंत्रणांचा दुरुपयोग, माध्यमांवर दबाव; लंडनमधून राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 21:35 IST

Rahul Gandhi: 'बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे, सगळं काही ठिक होईल. सर्व खटले मागे घेतले जातील.'

Rahul Gandhi London Visit : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी लंडनमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. बीबीसी डॉक्युमेंटरी वादावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, 'बीबीसीवरील कारवाईची घटना म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. हे एक प्रकारे अदानीसारखेच आहे. हा एक प्रकारे वसाहतवादी हँगओव्हर आहे,' अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली. 

बीबीसीने सरकारविरोधात बोलणे बंद करावे...ते पुढे म्हणाले, 'बीबीसीला आताच समजलंय, पण भारतात गेल्या 9 वर्षांपासून हा प्रक्रार सुरू आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जातात, हल्ले केले जातात आणि सरकारच्या बाजुने बोलणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. हा एक पॅटर्न आहे, मला वेगळी अपेक्षा नाही. जर बीबीसीने सरकारच्या विरोधात लिहिणे बंद केले तर सर्व काही पूर्वीसारखे होईल. ही भारताची नवीन विचारसरणी आहे. भारताने शांत राहावे अशी भाजपची इच्छा आहे,' असा खोचक टीकाही राहुल यांनी लगावला.

माध्यमांना गप्प करणे हा नवा ट्रेंड आहेजेव्हा राहुल गांधींना विचारण्यात आले की, मीडियाला गप्प बसवणे हा नवीन ट्रेंड आहे का? यावर ते म्हणाले, 'आज ज्या प्रमाणात हे केले जात आहे, त्या प्रमाणात हे पूर्वी कधीच केले गेले नव्हते. हा भारतीय संस्थांवरील हल्ला आहे, जो आधुनिक भारतात यापूर्वी कधीही दिसला नव्हता. त्यामुळेच भाजपच्या देशाला गप्प करण्याच्या प्रयत्नांविरोधात आवाज उठवण्यासाठी  आम्ही 'भारत जोडो यात्रा' काढली,' असेही ते म्हणाले.

लोकशाही संरचनेवर क्रूर हल्ले'भारताच्या लोकशाहीवर हल्ले होत आहेत आणि देशासाठी पर्यायी दृष्टीकोनातून एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. माध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवर हल्ले होत आहेत आणि आम्हाला लोकांचे प्रश्न सामान्य पद्धतीने मांडणे फार कठीण जात आहेत. भाजपला भारताने गप्प राहावे असे वाटते. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि भारताची संपत्ती आपल्या मित्रांना द्यायची,' अशी टीका राहुल यांनी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस