राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जावे - दिग्विजयसिंग
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:26+5:302014-12-27T23:38:26+5:30
भोपाळ - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली.

राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जावे - दिग्विजयसिंग
भ पाळ - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पूर्णवेळ अध्यक्षपद दिले जावे, अशी सूचना काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी येथे केली.सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, मात्र पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवावी, असे पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी म्हटले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष १४ राज्यांमध्ये विस्तारला व २००४ व २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तारूढ झाले. आता राहुल गांधी यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे प्रत्येक काँग्रेसजनाचे मत असल्याचेही ते पुढे म्हणाले. राहुल गांधी यांच्या सल्लागार मंडळात फेरबदलाची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर बोलताना सिंग यांनी, त्यांना सल्लागार मंडळाची आवश्यकता नाही, ते स्वत: समजदार आहेत, असे सिंग यांनी म्हटले. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाबाबत बोलताना त्यांनी, काँग्रेस व राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविषयी व खोट्या आश्वासनांविषयी नागरिकांना सचेत करावे, असे मत व्यक्त केले. राजकारणात परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.