शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 15:53 IST

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे.

Rahul Gandhi On Veer Savarkar Row: लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे भाजप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करत आहे. यातच राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर टीका करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या डिनर पार्टीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (27 मार्च) सायंकाळी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी त्यांच्या घरी जेवणाचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वीर सावरकरांचा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाचा एकही नेता डिनरला उपस्थित राहणार नसल्याची पुष्टी केली आहे. 'माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत,' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

सावरकरांचा अपमान सहन करणार नाहीराहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना विरोध केला. उद्धव ठाकरे यांनीही काल मालेगावच्या सभेतून राहुल गांधींना सुनावलं. 'सावरकर आमचे दैवत आहेत, त्यांनी 14 वर्षे अनन्वीत अत्याचार सहन केले आहेत. त्यांचा अपमान आपण सहन करणार नाही,' असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

महाराष्ट्रातील जनता प्रत्युत्तर देऊ शकतेदुसरीकडे संजय राऊत यांनीही राहुल गांधींचा समाचार घेतला. 'वीर सावरकर आमच्या आणि देशासाठी श्रद्धेचा विषय आहे. अंदमानात 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सोपी नाही. अशा टीकेला महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देऊ शकते. आम्ही तुमच्या सोबत आहोत पण वीर सावरकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत,' असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे