शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींकडून एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा लोकसभेत, अनिल अंबानींसह 'या' मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:39 IST

Rahul Gandhi News: लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टाईन फाईल्सचा मुद्दाही लोकसभेत उपस्थित केला.

लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टाईन फाईल्सचा मुद्दाही लोकसभेत उपस्थित केला. तसेच एपस्टाईन फाईल्समध्ये नाव आलं असल्याचा दावा करण्यात येत असलेले उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव घेत सरकारवर प्रश्नांची बरसात केली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, अनिल अंबानी नावाचे एक उद्योगपती आहेत. माझा प्रश्न आहे की ते अद्याप तुरुंगात का गेलेले नाहीत. याचं कारण आहे हे म्हणजे एपस्टाईन फाईल्स. त्याबरोबरच मला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनाही विचारायचं आहे की, त्यांची एपस्टाईनशी ओळख कुणी करून दिली. हरदीप सिंग पुरी यांची एपस्टाईन याच्याशी ओळख कुणी करून दिली याची माहिती माझ्याकडे आहे आणि ते पुरी यांनाही माहिती आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपांना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

दरम्यान, एपस्टाईन फाईलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मला पंतप्रधानांच्या डोळ्यांत भीती दिसत आहे. त्याची दोन कारणं आहेत. त्यातील एक कारण म्हणजे एपस्टाईन. राहुल गांधी यांनी केलेल्या या उल्लेखानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना ताकिद दिली.  मात्र राहुल गांधी थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, केंद्राच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या  अर्थसंकल्पावर कुणाचं तरी नियंत्रण दिसतंय आणि ते आहेत मिस्टर अदानी. अदानी एक सर्वसामान्य उद्योगपती नाहीत. तसेच त्यांची कंपनीही सर्वसामान्य नाही. त्यांच्या कंपनीवर अमेरिकेमध्ये एक खटला दाखल झालेला आहे. तसेच त्यांचं लक्ष्य अदानी नव्हे तर पंतप्रधान आहेत. ही कंपनी भाजपाचा आर्थिक आधार आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Raises Epstein Files in Parliament, Targets Government

Web Summary : Rahul Gandhi questioned the government in Parliament about the Epstein files, naming Anil Ambani and Hardeep Singh Puri. He alleged Modi fears the files and that the Adani group, facing US scrutiny, controls defense spending and financially supports BJP.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारAnil Ambaniअनिल अंबानीcongressकाँग्रेसBJPभाजपा