शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: ...तेव्हाच राहुल गांधी मातोश्रीवर जाणार, आदित्य ठाकरे काँग्रेस नेत्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 08:57 IST

Rahul Gandhi: काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुंबईत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पुढील बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘मोहब्बत की दुकान’ आता मुंबईपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे लवकरच दिल्लीत येत असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतील. त्यानंतर लगेच राहुल गांधी ठाकरे कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबईत जाणार आहेत. 

काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मुंबईत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पुढील बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत - काँग्रेसची सावरकरांच्या मुद्द्यावरील भूमिका शिवसेनेला अस्वस्थ करणारी आहे व ज्याप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बातम्या येताहेत, ते पाहता मला एकट्यालाच भाजपशी लढावे लागेल, असे दिसते.

के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. परंतु उद्धव ठाकरे दिल्लीत येण्याचे संकेत मिळाले नाहीत. यापूर्वीही जेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मविआ सरकारचे गठन होणार होते, त्याआधी आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत येऊन तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल गांधी यांच्याबरोबर बैठक झाली होती. 

इंदिरा गांधी यांनी घेतली होती भेटठाकरे कुटुंबीयांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी जाणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे दुसरे सदस्य आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. अलीकडच्या काही दिवसांत काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात जवळीक वाढत आहे. यावरून काँग्रेससाठी शिवसेना राष्ट्रवादीपेक्षा महत्त्वाची झाली आहे की काय, असे राजकीय परिस्थिती पाहून वाटते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे