Rahul Gandhi on Putin India Visit:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज(दि.4) संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्या या महत्त्वपूर्ण भेटीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, आता यावरुन देशातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळतेय. काँग्रेसने मोदी सरकारवर राजनैतिक प्रोटोकॉल धुडकावल्याचा आरोप केला आहे.
विरोधकांनाही देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, परंपरेनुसार कोणताही विदेशी पाहुणा भारतात आल्यावर विरोधी पक्षनेत्यालाही भेटतो. पण आता सरकार त्यांना जाणूनबुजून सांगते की, आमच्याशी भेटू नये. फक्त सरकारच नाही, आम्हीही देशाचे प्रतिनिधित्व करतो. अटल बिहारी वाजपेयींपासून ते मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत ही परंपरा पाळली जात होती. मात्र, सध्याचे सरकार असुरक्षिततेच्या भावनेतून अशी भेट होऊ न देण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रोटोकॉलचा उलटा वापर
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, परंपरेनुसार परदेशी पाहुणे विरोधी पक्षनेत्याशी भेटतात. पण आता याचे उलटे होत आहे. सरकार कोणतीही दुसरी आवाज उठू देत नाही आणि कोणत्याही भिन्न पक्षाचे मत ऐकण्यासही तयार नाही. सरकार प्रोटोकॉलचा उलटा वापर करत आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देत सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.
Web Summary : Rahul Gandhi criticizes the government for allegedly preventing a meeting with Putin. He argues this breaks tradition where foreign dignitaries meet opposition leaders. Priyanka Gandhi echoed this, accusing the government of stifling dissenting voices and misusing protocol. Congress demands explanation.
Web Summary : राहुल गांधी ने पुतिन के साथ मुलाकात रोकने के सरकार के कदम की आलोचना की। उन्होंने कहा कि विदेशी मेहमानों द्वारा विपक्षी नेताओं से मिलने की परंपरा तोड़ी गई। प्रियंका गांधी ने भी सरकार पर असहमति को दबाने और प्रोटोकॉल के दुरुपयोग का आरोप लगाया। कांग्रेस ने स्पष्टीकरण मांगा।