शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi On PM: '20000 कोटी कोणाचे आहेत?' राहुल गांधींचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 16:44 IST

Rahul Gandhi Slams PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पीएम मोदींना प्रश्न विचारले आहेत.

Rahul Gandhi Slams PM Modi Over Adani :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यानंतर आता ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत. रविवारी (2 एप्रिल) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपये कोणाचे? असा सवाल केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून 59 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी हा प्रश्न विचारला आहे. 

राहुल गांधी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “पंतप्रधान जी, प्रश्न विचारुन खूप दिवस झाले. तुम्ही अजून उत्तर दिले नाही, त्यामुळे आज परत विचारतोय. ₹20,000 कोटी कोणाचे आहेत? LIC, SBI, EPFO मध्ये जमा असलेले लोकांचे पैसे अदानीला का दिले जात आहेत?''

राहुल गांधींचा फेसबुक व्हिडिओ:- 

अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमकअदानी मुद्द्यावरुन केंद्र सरकारविरोधात राहुल गांधी सातत्याने आक्रमक होत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत सरकारला घेरले. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मागणीमुळे संसदेत सतत गोंधळाचे वातावरण आहे. 

काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोलअदानी प्रकरणावर राहुल गांधी सरकारला प्रश्न विचारत असल्यामुळे भाजपने त्यांचे सदस्यत्व काढले, असा आरोप काँग्रेस करत आहे. 25 मार्च रोजीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा एक व्हिडिओ शेअर करताना केंद्रावर निशाणा साधला होता. मी सत्य बोलतो, देशाच्या हितासाठी बोलतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्याच्या मार्गावर चालेन, असे ट्विट त्यांनी केले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGautam Adaniगौतम अदानीAdaniअदानीcongressकाँग्रेसBJPभाजपा