शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'परीक्षा प्रणालीच फसवी', NEET पेपर लीकच्या मुद्द्यावर राहुल गांधी-धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:52 IST

NEET Paper Leak : NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरुन आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिक्षमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यात जुंपली.

NEET Paper Leak : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी(दि.22) सुरुवात झाली. आज अर्थमंत्र्यांनी देशाचे आर्थिक सर्वेक्षण सादर केले, तर उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पुर्वी, लोकसभेत NEET पेपर लीकचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि द्रमुकसह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळाले. 

शिक्षणमंत्र्यांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, 'देशातील लाखो विद्यार्थी परीक्षा प्रणालीबाबत चिंतित आहेत आणि त्यांना ही प्रणाली फसवी वाटते. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की, जर तुमच्याकडे पैसा असेल, तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धती किंवा पेपर खरेदी करू शकता. विरोधकांचीही तीच भावना आहे. आपल्या परीक्षा पद्धतीत गंभीर समस्या आहे, हे संपूर्ण देशाला समजले आहे. 

हा मुद्दा फक्त NEET परीक्षेपुरताच मर्यादीत नाही, तर सर्व प्रमुख परीक्षांमध्ये गडबड आहे. अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे शिक्ष मंत्र्यांना द्यावी लागतील. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात? मंत्री महोदयांनी स्वतःला सोडून सगळ्यांना दोष दिला. मला वाटत नाही की, त्यांना इथे काय चालले आहे, याची थोडीही माहिती  आहे,' अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

शिक्षण मंत्र्यांचा पलटवारराहुल गांधी यांच्या या टीकेवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान संतापले. 'मला कोणाकडूनही माझ्या शिक्षणाचे प्रमाणपत्र नकोय. माझ्या जनतेने मला निवडून पाठवले आहे. माझ्या पंतप्रधानांनी मला जबाबदारी दिली आहे. देशाची परीक्षा प्रणाली खराब आहे, असे म्हणणे दुर्दैवी आहे. कपिल सिब्बल यांनीच 2010 साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या 7 वर्षांत पेपरफुटीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. हे (NEET) प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो की, NTA ने 240 हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत,' असा पलटवार प्रधान यांनी केला. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस