शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 21:10 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे.

Rahul Gandhi on BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत भाजप (BJP) नेते त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर नावापुढे  'मैं हूं मोदी का परिवार' असे लिहत आहेत. आता काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच्या ‘मी मोदींचा परिवार’ या मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला. 

रविवार, 3 मार्च रोजी पाटण्यातील इंडिया आघाडीच्या सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेते लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले होते. त्यांनी मोदींचे कुटुंब नसण्यावरुन टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी आज सकाळपासून भाजप नेत्यांनी ‘मैं हूं मोदी का परिवार’ अभियानाला सुरुवात केली. या अंतर्गत भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावासमोर ‘मैं हूं मोदी का परिवार’ असे जोडले.

राहुल गांधींची बोचरी टीकाआता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरुन भाजपवर बोचरी टीका केली. राहुल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "शेतकरी कर्जबाजारी, तरुण बेरोजगार, मजुर लाचार आणि देशाला लुटतोय मोदीचा खरा परिवार." 

लालूंवर मोदींचा निशाणालालूंच्या टीकेला आज स्वत: मोदींनी प्रत्युत्तर दिले. मोदी म्हणाले की, माझ्या कुटुंबावरून मला लक्ष्य केले गेले. मात्र मी संपूर्ण देशच माझे कुटुंब मानतो. आज देशातील कोट्यवधी माता-भगिनी-मुली हेच मोदीचे कुटुंब आहेत. देशातील प्रत्येक गरीब माझे कुटुंब आहे. घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असले तरी त्यांचे चरित्र एकच आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणामध्ये गुंतलेले इंडिया आघाडीचे नेते चिडचिड करत आहेत, अशी टीका मोदींनी केली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण