Rahul Gandhi On BJP: "जनतेच्या समस्या- कमाई, महागाई; भाजपचे मुद्दे- दंगली, हुकूमशाही", राहुल गांधींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 14:42 IST2022-05-17T14:42:32+5:302022-05-17T14:42:58+5:30
Rahul Gandhi On BJP: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परत एकदा देशातील वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi On BJP: "जनतेच्या समस्या- कमाई, महागाई; भाजपचे मुद्दे- दंगली, हुकूमशाही", राहुल गांधींचे टीकास्त्र
Rahul Gandhi On BJP: वाढत्या महागाईमुळे देशातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या महागाईवरुन गेल्या कित्येक दिवसांपासून विरोधक सरकारवर टीका करताना दिसतात. यातच आता घाऊक महागाईने 9 वर्षांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. यावरुन आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
एप्रिल 2022 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक आधारित चलनवाढीचा दर (WPI आधारित महागाई) मार्चमधील 14.55 टक्क्यांच्या तुलनेत 15 टक्क्यांवरून 15.08 टक्क्यांवर गेला आहे. या वाढत्या महागाईवरुन राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल करत भाजपचे मुद्दे दंगली आणि हुकूमशाही असल्याचा आरोप केलाय.
जनता के मुद्दे - कमाई, महंगाई
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2022
BJP के मुद्दे - दंगा, तानाशाही
देश को आगे बढ़ाना है तो भाजपा की नकारात्मक सोच और नफ़रत की राजनीति को हराना है।
आओ मिलकर ‘भारत जोड़ो’
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "जनतेच्या समस्या - कमाई, महागाई. भाजपचे मुद्दे - दंगली, हुकूमशाही. देशाला पुढे न्यायचे असेल, तर भाजपच्या नकारात्मक विचारसरणीचा आणि द्वेषाच्या राजकारणाचा पराभव केला पाहिजे. चला एकत्र भारताला जोडूया," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
किरकोळ महागाई वाढली
वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2022 मध्ये महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातूंच्या किमतींमध्ये वाढ आहे. ही वाढ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे उद्भवली आहे. यामुळे देशातील महागाई 15 टक्क्यांहून पुढे गेली आहे.