शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'पप्पू' नाही, ते तर 'गाढवांचे सम्राट'; भाजपा आमदाराची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 12:27 IST

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत.

इंदौर : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतशा वादग्रस्त टीका सुरु झाल्या आहेत. राफेल घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टीका करताना भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या आमदार मुलाची जीभ घसरली आहे. राहूल गांधी आता पप्पू राहिले नसून गाढवांचे सम्राट झाले आहेत, अशी टीका केली आहे. 

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राफेल डीलची कागदपत्रे चोरीला गेल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच एअर स्ट्राईकवरूनही त्यांना लक्ष्य केले आहे. यावर भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पूत्र आकाश विजयवर्गीय यांच्या मुलाने टीका केली आहे. आकाश हे मध्य प्रदेशमधील इदौर मतदारसंघाचे आमदार आहेत. 

यापूर्वी राहुल गांधी यांना पप्पू म्हणून ओळखले जात होते. हे नाव हानीकारक नव्हते आणि गोंडस होते. परंतू राहूल आता देश विरोधी असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव बदलत असून पप्पूवरून त्यांना आजपासून 'गधों का सरताज' म्हणून ओळखले जाईल, अशी टीका केली आहे. 

खरे पोस्टर बॉय मोदीचराहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी एअर स्ट्राईकसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यास उत्तर देताना मोदीच पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल यांनी केला. मी त्या प्रकरणावर जास्त भाष्य करु इच्छित नाही. मात्र, कालच मी बातमी वाचली. त्यामध्ये पुलमावा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याचं म्हटलं आहे. त्या पीडित कुटुंबीयांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. काँग्रेसनेही त्याबाबत भूमिका घेतली आहे. भाजपाकडून काँग्रेस नेत्यांवर पोस्टर बॉय असल्याचा आरोप करण्यात येत आहे, याबाबतच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींनी खरे पोस्टर बॉय मोदीच असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानला तेच गेले होते, त्यांनी गळाभेट घेतली, त्यांनीच नवाझ शरीफ यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं, असे सांगत राहुल गांधींनी एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरुन मोदींना लक्ष्य केलं. तसेच याबाबत मी अधिक काहीही बोलू इच्छित नसल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसMLAआमदारMadhya Pradeshमध्य प्रदेश