‘राहुल गांधींनी कधीच श्रेय घेतले नाही’- निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:40 IST2017-11-04T00:40:16+5:302017-11-04T00:40:25+5:30

निर्भयावरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या भयानक घटनेनंतर दु:खात असलेल्या आमच्या कुटुंबाची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खूप काळजी घेतली आणि भावनात्मक व आर्थिक मदतही केली. परंतु याचे कोणतेही श्रेय त्यांनी घेतले नाही, असे निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह यांनी सांगितले.

'Rahul Gandhi never taken credit' - Nirbhaya's father Badrinath Singh | ‘राहुल गांधींनी कधीच श्रेय घेतले नाही’- निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह

‘राहुल गांधींनी कधीच श्रेय घेतले नाही’- निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह

नवी दिल्ली : निर्भयावरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या भयानक घटनेनंतर दु:खात असलेल्या आमच्या कुटुंबाची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खूप काळजी घेतली आणि भावनात्मक व आर्थिक मदतही केली. परंतु याचे कोणतेही श्रेय त्यांनी घेतले नाही, असे निर्भयाचे वडील बद्रीनाथ सिंह यांनी सांगितले.
ते म्हणाले की, डिसेंबर २०१२मध्ये माझ्या मुलीवर सामूहिक अत्याचार होऊन तिचा मृत्यू झाल्यानंतर अनेक जणांनी मदत केली. परंतु राहुल गांधी नेहमीच आमच्या पाठीशी उभे ठाकले व त्यांनी कटाक्षाने सांगितले होते की याची कुठेही वाच्यता करू
नका.
त्या भयकारी घटनेने आमच्या मनावर कायमचा व्रण राहिला. परंतु राहुल गांधी हे देवदूतासारखे आले. राजकारण काहीही असेल, परंतु ते आमच्यासाठी देवदूत आहेत, असे बद्रीनाथ सिंह म्हणाले.

Web Title: 'Rahul Gandhi never taken credit' - Nirbhaya's father Badrinath Singh