शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video: जितेंद्र आव्हाडांचं राहुल गांधींना हस्तांदोलन, दिल्लीतील भेटीचा शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:35 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली.

मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह ९ आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यातच, आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दावा केला जात असून दोन्ही गटाकडून एकमेकांना खोटं ठरवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारांची बैठक घेऊन काही नियुक्त्या केल्या. तर, अजित पवारांनी या बैठकीत तथ्य नसल्याचे म्हटले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी, जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.   

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अचानक मोठी फूट पडल्याने शरद पवार यांना देशातील बड्या नेत्यांनी फोन करुन विचारपूस केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही शरद पवारांना फोन करुन झाल्या घटनेबाबत विचारणा केली होती. त्यावर, आता पुन्हा लढायला निघुयात, पुन्हा जिंकूयात, असे शरद पवार यांनी सोनिया गांधींना म्हटले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली. या बैठकीसाठी पक्षाचे प्रमुख राजधानी दिल्लीत पोहोचले होते. यावेळी, राहुल गांधींनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच, राष्ट्रवादीतील फूट आणि देशातील सद्यस्थितीतील राजकारणावर चर्चा केली. त्यावेळी, जितेंद्र आव्हाड हेही शरद पवारांसमवेत होते. शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची ओळखही करुन दिली. तेव्हा राहुल गांधींना जितेंद्र आव्हाडांना हस्तांदोलन केल्याचं पाहायला मिळालं.  

९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणा शरद पवार यांच्यावतीने पीसी चाको यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज ८ ठराव पारित केले. समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्लीcongressकाँग्रेस