शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

'...म्हणून चौकीदारानं सीबीआयच्या संचालकांना हटवलं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:45 IST

राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सीबीआयमधील वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी राजस्थानच्या झालावाड दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सीबीआयमधील वादावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी सीबीआयमध्ये सुरु असलेला वाद आणि राफेल डील प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, 'काल रात्री चौकीदारने सीबीआयच्या संचालकांना हटविले, कारण सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते.'

दरम्यान, सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. वर्मा यांच्या जागी एम. नागेश्वर यांची अंतरिम संचालकरदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे सहसंचालकपदाची जबाबदारी होती. नागेश्वर राव 1986 च्या ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 

राफेलच्या चौकशीतून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याची कारवाई याच हालचालींचा एक भाग असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला. वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. 

सरकारला तपासाचा अधिकार नाही- जेटलीसीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या चौकशी केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार एसआयटीकडून केली जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दलची माहिती दिली. सीबीआय देशाची प्रतिष्ठीत तपास यंत्रणा असून त्यांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी सरकार तत्पर आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी सरकारच्या कक्षेत येत नाही, असे जेटली यांनी म्हटले. सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या मोठं शीतयुद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

(CBIvsCBI: आलोक वर्मा, राकेश अस्थाना सक्तीच्या रजेवर; नागेश्वर राव अंतरिम संचालकपदी)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदी