शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 18:09 IST

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

Rahul Gandhi Leader of the Opposition :काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधकांनी एकमताने 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Leader of Opposition) निवड केली आहे. हे पद भूषवणारे राहुल गांधी, हे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी राजीव गांधी (1989-90) आणि सोनिया गांधी (1999-2004) यांनी हे पद भूषवले होते. विरोधी पक्षनेता हा साहजिकच पंतप्रधानपदाचा दावेदार मानला जातो. आता प्रश्न पडतो की, आजवर असे किती विरोधी पक्षनेते आहेत, जे नंतर पंतप्रधान झाले.

खरं तर हे पद सुरुवातीला अस्तित्वातच नव्हते, पण 1969 मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली, तेव्हा पहिल्यांदा हा शब्द अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेस (ओ)चे रामसुभाग सिंह यांनी या पदासाठी दावा केला होता. 1977 मध्ये Leaders of opposition in parliament act, 1977 द्वारे या पदाला वैधानिक दर्जा देण्यात आला आणि त्यांचे अधिकार आणि सुविधा परिभाषित केल्या गेल्या.

1969 पासून 15 जण विरोधी पक्षनेते बनले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी तीनदा, तर अटलबिहारी वाजपेयी आणि यशवंत राव चव्हाण यांनी दोनदा हे पद भूषवले आहे. तसेच जगजीवन राम, सोनिया गांधी, शरद पवार, सुषमा स्वराज यांनीदेखील हे पद भूषवले होते. यापैकी अटलबिहारी वाजपेयी वगळता कोणताही विरोधी पक्षनेता पुढे पंतप्रधान होऊ शकला नाही. 

अधिकार आणि कर्तव्‍ये1980 आणि 2014 ते 24 दरम्यान, या पदावर कोणीही नव्हतं. लोकसभेतील एकूण खासदारांपैकी किमान 10 टक्के, म्हणजे 54 खासदार विरोधी पक्षाकडे असतील, तरच हे पद भूषवता येते. 2014 ते 2024 पर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाकडे एवढे संख्याबळ नव्हते. यावेळी काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळेच त्यांना हे पद मिळाले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यांचे शासकीय सचिवालयात कार्यालय असेल. पगार आणि भत्त्यांसह त्यांना दरमहा अंदाजे 3.25 लाख रुपये मिळतील. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आता लोकपाल, सीबीआय प्रमुख, मुख्य निवडणूक आयुक्त आदी महत्त्वाच्या नियुक्त्यांसाठी पॅनेलवर असतील. त्याचप्रमाणे, CVC, केंद्रीय माहिती आयोग आणि NHRC प्रमुखांच्या निवडीशी संबंधित पॅनेलचे सदस्य देखील असतील. पंतप्रधान हे अशा सर्व पॅनेलचे प्रमुख असतात.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा