राहुल गांधी करणार कैलास-मानसरोवर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:30 IST2018-04-30T02:30:38+5:302018-04-30T02:30:38+5:30

कैैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी रविवारी जन आक्रोश सभेत जाहीर केले

Rahul Gandhi to Kailash-Mansarovar Yatra | राहुल गांधी करणार कैलास-मानसरोवर यात्रा

राहुल गांधी करणार कैलास-मानसरोवर यात्रा

नवी दिल्ली : कैैलास-मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी रविवारी जन आक्रोश सभेत जाहीर केले. कर्नाटकमधील हुबळी येथे जात असताना त्यांचे विमान आकाशात झटके खाऊ लागले व एकदम आठ हजार फुट खाली आले. याच कठीण प्रसंगी यात्रेला जाण्याचा विचार मनात पक्का केला असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मी शिवभक्त आहे आणि हिंदु धर्मावर माझी गाढ श्रद्धा आहे असेही या सभेत सांगायलाही राहुल गांधी विसरले नाहीत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान राहुल गांधी यांनी मंदिरांना दिलेल्या भेटीवरुन खूप टीका झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी कैैलास-मानसरोवर यात्रेला जाणार आहेत. त्या यात्रेचा आगामी लोकसभा निवडणुकीत ते पुरेपूर लाभ करुन घेतील अशी चर्चा आहे.

Web Title: Rahul Gandhi to Kailash-Mansarovar Yatra