शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

नवी खेळी! राहुल गांधी जनमत तयार करणार; अदानी मुद्द्यावर देणार जोर, देशभरात आंदाेलने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 08:58 IST

आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी राहुल गांधी यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

- हरिश गुप्तानवी दिल्ली : मोदी आडनावाचे सगळे जण चोर आहेत, या वक्तव्याप्रकरणी सूरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी अपील करण्यास विलंब लावत आहेत. या निकालानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. त्याबाबत आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी राहुल गांधी यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी २०१९ साली कर्नाटकमध्ये एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात अपील करावे, असे त्यांचे वकील अभिषेक मनू संघवी यांचे मत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सर्व राज्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करावीत, असे आदेश त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. आपल्याबाबत लोकसभा सचिवालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांना जनमत, तसेच सहानुभूतीचे वातावरण निर्माण करायचे आहे, असे कळते. 

याचिका तयार...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात सुरत येथील ट्रायल कोर्टाने दिलेल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका तयार आहे. सुरत येथील सत्र न्यायालयात ती लवकरच दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्वोच्च कायदेशीर सल्लागार एक-दोन दिवसांत सुरत सत्र न्यायालयात दाखल होणाऱ्या पुनर्विलोकन याचिकेवर काम करत आहेत.

‘चौकीदार चोर है, पेक्षा अदानी मुद्दा प्रभावी’

‘चौकीदार चोर है’ या उल्लेखापेक्षा अदानी प्रकरणामुळे जनमत आपल्या बाजूने तयार होऊ शकते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाटते. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, अदानी प्रकरणाबाबत सातत्याने बोलत राहिल्यास जनतेचा व अन्य विरोधी पक्षांचाही आपल्याला पाठिंबा मिळेल, अशी शक्यता राहुल गांधी यांना वाटते. तृणमूल काँग्रेस, आप, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी अदानीच्या मुद्द्यावर काँग्रेसला पूरक भूमिका घेतली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाAdaniअदानी