शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:11 IST

'आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे.'

Rahul Gandhi in Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज(3 फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. आजपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील 'मेक इन इंडिया' आणि एकंदरीत उत्पादन क्षेत्रावर निशाणा साधला. देशातील उत्पादन 60 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर असल्याची टीका राहुल यांनी केली.

'मेक इन इंडिया' चांगली कल्पनायावेळी राहुल गांधी म्हणाले की, 'राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत नवीन काहीच नाही. यात बेरोजगारीचा उल्लेख नाही. यूपीए किंवा एनडीएने तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले नाही. मेक इन इंडियाबद्दल पंतप्रधान जे बोलले ते चांगलेच आहे. पण उत्पादनात अपयश येत आहे. आम्ही पंतप्रधानांना दोष देत नाही, पंतप्रधानांनी प्रयत्न केला, कल्पना योग्य होती पण ते अपयशी ठरत आहेत.'

उत्पादन सर्वात खालच्या पातळीवर मेक इन इंडियाचा उल्लेख करत राहुल गांधींनी फोन दाखवला अन् म्हणाले की, 'हा फोन भारतात बनवला, असे आपण म्हणत असलो तरी, त्याचे पार्ट्स चीनमधून आले आहेत आणि इथे फक्त असेंबल केले आहेत. जग पूर्णपणे बदलत आहे. आपण पेट्रोलियमपासून बॅटरी आणि अणुऊर्जेकडे वाटचाल करत आहोत. सर्व काही बदलत आहे. मागच्या वेळी क्रांती झाली, तेव्हा भारत सरकारने संगणक क्रांती पाहिली होती आणि त्यावर लक्ष केंद्रित केले होते. आज त्याचा परिणाम दिसून येत आहे. संगणक आला की लोक हसायचे. मी वाजपेयीजींचा आदर करतो, पण तेही विरोधात बोलले होते. आज देशातील उत्पादन 60 वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

रिलायन्स, अदानी, टाटा वाढले पण वेगाने नाहीयुक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. राहुल यांनी रोबोट्सपासून ड्रोनपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की, 'आज लोक एआयबद्दल बोलत आहेत. एआय डेटावर कार्य करते. डेटाशिवाय काहीही नाही. प्रश्न असा आहे की एआय कोणता डेटा वापरत आहे? भारताकडे कोणतीही आकडेवारी नाही. एकतर AI चीनी किंवा अमेरिकन डेटा वापरेल. मी या देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशात क्रांती येणार आहे. आपण पेट्रोलवरुन इलेक्ट्रिक मोटरवर स्विच करत आहोत. युद्ध, वैद्यकीय उपचार, शिक्षण, सर्वकाही बदलत आहे. कोणताही देश उपभोग आणि उत्पादन या दोन गोष्टींवर चालतो. 1990 पासून सर्व सरकारांनी उपभोगावर चांगले काम केले आहे. रिलायन्स, अदानी, टाटा, महिंद्रा या सर्वांचा झपाट्याने विकास झाला, पण एकूणच देशाचा विकास झाला नाही.' 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBudget 2025अर्थसंकल्प २०२५Parliamentसंसद