शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Rafale deal: सरकारनं रिलायन्सला कंत्राट देऊन HALचा अपमान केला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:35 IST

राहुल गांधींचा पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा

बंगळुरु: राफेल विमान खरेदीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर वारंवार निशाणा साधणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडमध्ये काम करणं अभिमानास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात काही सामरिक महत्त्व असलेल्या संस्थांची उभारणी करण्यात आली. त्यात हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेडचा समावेश होतो, असं राहुल गांधी म्हणाले. अनिल अंबानींच्या रिलायन्सला राफेलचं कंत्राट दिल्यानं राहुल यांनी अनेकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. हिंदुस्तान एरॉनिटिक्स लिमिटेड (एचएएल) आधुनिक भारताचं मंदिर आहे. राफेलचं कंत्राट रिलायन्सला देऊन सरकारनं एचएएलचा अपमान केल्याचं राहुल गांधी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले. 'देशासाठी तुम्ही जी कामगिरी बजावली आहे, ती अतिशय शानदार आहे. देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एचएएल कर्मचाऱ्यांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. उच्च शिक्षणात जे आयआयटीचं स्थान आहे, तेच संरक्षण क्षेत्रात एचएएलचं स्थान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचं काम एचएएलनं केलं आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी एचएएलच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. काँग्रेस अध्यक्षांनी एचएएलच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला. भविष्यात फक्त भारत आणि चीन हे दोनच देश अमेरिकेशी स्पर्धा करु शकतात, असं ओबामा म्हणाले होते. ओबामांच्या त्या विधानावरुन तुमच्या योगदानाचं महत्त्व लक्षात येतं, असं राहुल म्हणाले. मी तुमच्या मनातलं ऐकायला आलो आहे, असं त्यांनी म्हटलं. यानंतर एचएएलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. एका 70 वर्षे जुन्या कंपनीला मिळणारं कंत्राट रिलायन्सला देण्यात आलं. हे आमच्यासाठी अपमानास्पद असल्याची भावना एचएएलचे निवृत्त कर्मचारी असलेल्या सिराजुद्दीन यांनी व्यक्त केली. ज्या कंपनीत सुधारणा करायला हव्यात, त्या कंपनीला संपवलं जातं असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस