राहुल गांधी यांनी मिळविला आहे ब्लॅक बेल्ट, विजेंदर सिंगच्या प्रश्नावर दिले उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:17 IST2017-10-28T05:17:37+5:302017-10-28T05:17:45+5:30

नवी दिल्ली : व्यक्तिगत जीवनात खेळाला खूप महत्त्व देतो. दररोज किमान चार तास व्यायाम करतो, धावतो आणि पोहतो, तसेच खेळतोही.

Rahul Gandhi has won the Black Belt, Vijender Singh's answer to the question | राहुल गांधी यांनी मिळविला आहे ब्लॅक बेल्ट, विजेंदर सिंगच्या प्रश्नावर दिले उत्तर

राहुल गांधी यांनी मिळविला आहे ब्लॅक बेल्ट, विजेंदर सिंगच्या प्रश्नावर दिले उत्तर

नवी दिल्ली : व्यक्तिगत जीवनात खेळाला खूप महत्त्व देतो. दररोज किमान चार तास व्यायाम करतो, धावतो आणि पोहतो, तसेच खेळतोही. जपानी युद्धकला ‘आयकिडो’मध्ये मी ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. तथापि, मी याबाबत जाहीर बोलत नाही. तथापि, गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला आनंद घेता आला नसला, तरी मी दररोज न चुकता किमान तासभर तरी खेळत असतो. युवकांना प्रोत्साहन मिळणार असेल, तर मी यासंदर्भातील माझे व्हिडिओ नक्कीच सोशल मीडियावर पोस्ट करीन, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलखुलासपणे सांगितले.
नवी दिल्ली येथे गुरुवारी एका कार्यक्रमानंतर ते लोकांशी संवाद साधत होते. त्यावेळी आॅलिम्पिक पदक विजेते मुष्टीयोद्धा (बॉक्सर) विजेंदर सिंग यांनी राहुल गांधी यांना खेळाविषयी सवाल विचारला होता.

Web Title: Rahul Gandhi has won the Black Belt, Vijender Singh's answer to the question