शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:46 IST

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थानात काँग्रेसची धूळधाण

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनीकाँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र राहुल यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या एकाही नेत्यानं राजीनामा दिलेला नाही. याबद्दल राहुल यांनी पहिल्यांदाच उघडपणे नाराजी व्यक्त केली. मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनही काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री, महासचिव, प्रभारी आणि वरिष्ठ नेते पद सोडायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी युवक काँग्रेसच्या बैठकीत त्यांची नाराजी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी राहुल यांनी काँग्रेस कार्यकारणीची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. आता राहुल यांनी पुन्हा एकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्यानं गेहलोत आणि कमलनाथ यांच्यावरील दबाव वाढला आहे. राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कमलनाथ यांनी याबद्दल भाष्य केलं. 'राहुल गांधींचं विधान योग्य आहे. यासाठी कोण जबाबदार आहे, याची मला कल्पना नाही. मात्र मी आधीच राजीनामा देऊ केला होता. होय, मी पराभवासाठी जबाबदार आहे. पण दुसऱ्या नेत्यांबद्दल मला काहीही माहीत नाही,' असं कमलनाथ म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील 29 जागांपैकी केवळ एक जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं. तर 25 जागा असलेल्या राजस्थानात काँग्रेसची पाटी कोरी राहिली. या दोन राज्यांमद्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसनं भाजपाला पराभव केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा