'राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधान होण्याची लायकी नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 11:30 IST2018-06-07T11:30:23+5:302018-06-07T11:30:57+5:30

राहुल गांधी व्यसनी असून पंतप्रधान होण्याची त्यांची लायकी नाही.

rahul gandhi is a drug addict, dont deserve to be pm says akalidal mla manjinder s sirsa | 'राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधान होण्याची लायकी नाही'

'राहुल गांधी व्यसनी, पंतप्रधान होण्याची लायकी नाही'

नवी दिल्ली- भाजपाच्या पाठिंब्यावर दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी व्यसनी असून पंतप्रधान होण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग यांनी केली आहे. राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला. 

मनजिंदर सिंग यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. 'पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचं व्यसन आहे असं म्हणणारा व्यक्तीच आज व्यसनी दिसत आहे', असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी लायक नसून त्यांनी तर आधी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवं, असंही ते म्हणाले आहेत. 'माझं म्हणणं ज्यांना मान्य असेल त्यांनी रिट्विट करावं, असंही ट्विटर युजर्सला मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटलं. 
 

Web Title: rahul gandhi is a drug addict, dont deserve to be pm says akalidal mla manjinder s sirsa