शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी वायनाडला दिले १७५ स्मार्ट टीव्ही; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 01:06 IST

केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले

वायनाड (केरळ) : कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने केरळ सरकारने आॅनलाइन शिक्षण सुरू केले असून, ते घेण्यात आदिवासी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील कलपेट्टामध्ये १७५ स्मार्ट टीव्ही दिले आहेत. राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्मार्ट टीव्ही देण्याचा निर्णय घेतला. हे १७५ स्मार्ट टीव्ही ही तात्पुरती सोय आहे. प्रत्यक्षात त्या आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक, स्मार्टफोन, केबल टीव्ही, इंटरनेट कनेक्शन दिले जाणे गरजेचे आहे. तसे केले, तरच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल, असे राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या नव्या शिक्षणपद्धतीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच सुटू नये, यासाठी ही सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे लागेल, ते कळवावे, तशी सोय आपण करू, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही कळविले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण सुरू केलेली फर्स्ट बेल योजना अतिशय चांगली आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ज्या वस्तू असायला हव्यात, त्यांचीही व्यवस्था करायला हवी. त्यासाठी आपण हे पाऊ ल उचलले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. याआधी त्यांनी आपल्या वाढदिवशी विद्यार्थ्यांसाठी ५0 टीव्ही संच दिले होते. मल्लपूरम व कोळीकोड येथील विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी १00 स्मार्टफोनची व्यवस्था याआधी करून दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडonlineऑनलाइनEducationशिक्षण