शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

BJP On Sankalp Satyagraha: 'कोणत्या काँग्रेस नेत्याने देशासाठी इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या?', भाजप नेत्याचे प्रियंका गांधींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 16:05 IST

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात राजधानी दिल्लीतील राजघाटावर काँग्रेसने सत्याग्रह केला.

Rahul Gandhi Disqualified: राजधानी दिल्लीतील राजघाटावर सुरू असलेल्या काँग्रेसच्या संकल्प सत्याग्रहावर भाजप नेते टीका करत आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'सत्याग्रहाच्या नावाखाली महात्मा गांधींच्या समाधीवर जे लोक लोकशाहीचा अपमान करत आहेत, त्यात सत्य नाही तर अहंकार स्पष्टपणे दिसत आहे.'

कोणत्या काँग्रेस नेत्याने रक्त वाहिलं?काँग्रेसचे भाजपवरील आरोप निराधार असल्याचे सांगत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'राहुल गांधींवर जी कारवाई झाली, ती न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. संसदेचा जुना नियम होता, ज्या अंतर्गत सदस्यत्व जाते. हे लोक न्यायालयाचा अपमान करत आहेत. माझ्या कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले, या प्रियंका गांधींच्या वक्तव्यावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले, आपल्याला इतिहासात शिकवले गेले की, गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने रक्त न सांडता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, मग प्रियंका गांधींनी सांगावे की, कोणत्या काँग्रेस नेत्याने रक्त सांडले? स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या, काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या किंवा इंग्रजांच्या गोळ्या झेलणाऱ्या एकाही काँग्रेस नेत्याचे नाव सांगावे,' असे आव्हानच त्यांनी दिले. 

गांधीजींचा अपमान केलात्रिवेदी यांनी यावेळी काँग्रेसच्या सत्याग्रहाला गांधीजींचा अपमान असल्याचे म्हटले. गांधीजींनी त्यांचा पहिला सत्याग्रह एका सामाजिक कारणासाठी केला होता, इथे हे सगळे वैयक्तिक कारणासाठी न्यायालयाविरुद्ध सत्याग्रह करत आहेत. जे काही आरोप केले जात आहेत, ते निराधार आहेत. ते सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका करतात. देशातील मागासलेल्या समाजाविरुद्ध द्वेष पसरवता आणि त्यासाठी शिक्षा झाल्यावर व्हिक्टम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतात. यात अहंकार आणि निर्लज्जपणा दिसतो. तुमच्या आजी इंदिरा गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. बोफोर्स घोटाळ्यात राजीव गांधींचे नाव पुढे आले होते. तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीबद्दल बोलत आहात?' अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस