शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"आधी कोणाला मारायचं असतं तर..."; वाराणसीतल्या 'त्या' घटनेवरुन राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:58 IST

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PM Modi Security Breach : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे रोड शो देखील केला. मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी त्याच्या वाहनावरुन काहीतरी वस्तू बाजूला करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेससह अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकली असल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या घटनेंवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती जी त्यांच्या एसयूव्हीच्या बोनेटवर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोक याला चप्पल म्हणत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे याची पुष्टी झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रूफ वाहनावर चप्पल फेकण्यात आल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बोनेटमधून चप्पल उचलून फेकताना दिसत आहे. 

या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. "आता देशात पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नाही. पूर्वी ५६ इंचाची असलेली छाती आता ३२ ची झाली आहे. आता मोदींना मानसिकरित्या मोठी अडचण होणार आहे. कारण लोकांना घाबरवून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत आहे. वाराणसीमध्ये कोणीतरी चप्पल मारली. निवडणुकीच्या आधी कोणाला मारायचं असतं तर तो घाबरला असता. त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या मातृसंघटनेतही अडचणी आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी मोडून काढली. दुसरीकडे आता खूप प्रबळ विरोधक आहेत. ही खूप मनोरंजक वेळ आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

युजीसी नीट परीक्षा रद्द केल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटीबाबतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याशी शेअर केल्या. मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण काही कारणांमुळे नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसVaranasiवाराणसी