शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Lord Ram: राहुल गांधींची थेट भगवान रामाशी तुलना, नव्या वादाला तोंड! भाजपाकडून Salman Khurshid अन् काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 00:02 IST

काँग्रेसचे सलमान खुर्शीद नक्की काय म्हणाले, वाचा सविस्तर... 

Rahul Gandhi Lord Ram: भाजपा आणि काँग्रेस यांच्यात धर्माच्या मुद्द्यावरून किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादविवाद, हेवे-दावे होणं यात काहीच नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी हे एकमेकांवर टीका करत असताना बऱ्याचदा प्रभू श्रीराम यांच्याबद्दलचा संदर्भ वापरताना दिसतात. पण आज काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू श्रीरामांशी केल्याने चांगलाच वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भगवान राम म्हटले. त्यावरून भाजपानेही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सलमान खुर्शीद काय म्हणाले?

सलमान खुर्शीद म्हणाले, राहुल गांधी हे एखाद्या तपस्वी, योगींसारखे आहेत, जे ध्यानासहित तपश्चर्या करत आहेत. राहुल गांधींचे कौतुक करताना सलमान खुर्शीद पुढे म्हणाले, राहुल गांधी हे सुपर ह्युमन आहेत. आम्हाला इथे थंडीत वाजत असल्याने आम्ही जॅकेट घालतो, पण ते टी-शर्ट घालून (त्याच्या भारत जोडो यात्रेसाठी) देशभर फिरताना दिसत आहे. त्यांची ही यात्रा एखाद्या एकाग्रतेने तपश्चर्या करणाऱ्या योगीं प्रमाणेच आहे. प्रभू रामाशी तुलना करताना खुर्शीद असेही म्हणाले की, प्रभू रामाचे 'खडाव (पादुका)' दूर जातात. कधी कधी भरत 'खडाव' घेऊन भगवना राम जिथे जाऊ शकत नाहीत तिथे ते खडाव नेतात. आता भरताप्रमाणेच आम्हीही यूपीमध्ये खडाव वाहून आणल्या आहेत. आता खडाव यूपीला पोहोचले आहेत, त्यामुळे राम जी (राहुल गांधी)ही लवकरच येतील.

भाजपाकडून खुर्शीद यांच्यावर टीकास्त्र

भाजपाचे शहजाद पूनावाला यांनी सलमान खुर्शीद यांच्या ट्विटरवरील टिप्पणीला हिंदू श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले की, सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केली, स्वत:ची तुलना भरतशी केली. हे खूपच धक्कादायक आहे. ते इतर धर्मातील देवांशी अशी कोणाची तुलना करण्याचे धाडस करून दाखवू शकतील का? भगवान राम यांचे अस्तित्व नाकारणे आणि राम मंदिर बांधणी थांबवणारे असे बोलत असतील तर हा हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान आहे. खुर्शीद जे बोलतात ते राहुल यांना तरी मान्य आहे का?, असे काही रोखठोक सवाल भाजपाकडून करण्यात आले.

दरम्यान, राहुल गांधी मात्र सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. तामिळनाडूपासून सुरू झालेली ही यात्रा जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपा