शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: राहुल गांधींवर ईडीची मोठी कारवाई होऊ शकते काय? काॅंग्रेसमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:58 IST

Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे.

- आदेश रावल  नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात राहुल गांधी म्हणाले होते की, माझ्यावर भारतमातेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. हेच विधान या घटनाक्रमामागचे मोठे कारण आहे, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांची प्रामाणिक प्रतिमा ईडीच्या माध्यमातून खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे आहे की, भाजप अथवा डावे पक्ष ज्याप्रमाणे आपले वृत्तपत्र चालवितात त्याप्रमाणेच नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस पक्षाचे वृत्तपत्र होते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जर भाजपचे वृत्तपत्र तोट्यात गेले तर ते त्याला वाचविणार की नाही? राहुल गांधी यांनीही तेच केले. राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या शक्यतेची चर्चा आहे. काँग्रेस नेतृत्वाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशिवाय सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि संसद सदस्यांना दिल्लीत थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निपथ योजनेवरून काँग्रेस भलेही दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करीत असेल; पण राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या चर्चेमुळे काँग्रेस काळजीत आहे. 

काय वाटते काँग्रेसच्या नेत्यांना ?राहुल गांधी यांना अटक करण्याची चूक सरकार करणार नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. पण, नेत्यांना अशी काळजी आहे की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याप्रमाणे कारवाई होऊ नये. 

राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने उद्या, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ४० तास चौकशी केली. नॅशनल हेराॅल्ड वृत्तपत्राशी संबंधित आणखी महत्वाचे प्रश्न त्यांना विचारणार असल्याचे कळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयcongressकाँग्रेसPoliticsराजकारण